राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात ‘बंद’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. महाराष्ट्रासह हरयाणामध्ये देखील विधानसभेसाठी आज मतदान झाले. 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान झाले. पाचनंतर शेवटच्या एका तासात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासामध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी मतदान झाले. ग्रामीण भागामध्ये मतदान जास्त झाले तर शहरी भागात मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरी भागात मतदानाचा टक्का कमी आहे.

निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करताना दिसून आले. शनिवारी राज्यातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. तर हवामान खात्याने मतदानादिवशी पावसाची शक्यता वर्तवली होती.

Visit  :Policenama.com

You might also like