अहमदनगर जिल्ह्यातील 7 आमदार पराभूत, महाआघाडीला 9 तर भाजपला फक्त 3 जागा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून, राष्ट्रवादीला 6, काँग्रेसला 2 व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला 1 अशा महाआघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या पारड्यात अवघ्या तीन जागा पडल्या आहेत. शिवसेना जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार झाली आहे. हा निकाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना धक्का देणारा आहे. तब्बल सात आमदार या निवडणुकीत पराभूत झाले. पराभूत झालेल्या विद्यमान आमदारांमध्ये राम शिंदे, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब कांबळे, विजय औटी, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रात पार पडली. त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या ‍निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांची नावे जाहीर केली. यात २१६-अकोले (अ.ज) विधानसभा मतदारसंघामध्ये डॉ. किरण यमाजी लहामटे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), २१७- संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये थोरात विजय उर्फ बाळासाहेब (इंडियन नॅशनल कॉंग्रेस), २१८-शिर्डी मतदारसंघामध्ये विखे पाटील राधाकृष्ण एकनाथराव (भारतीय जनता पार्टी), २१९-कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), २२०- श्रीरामपूर (अ.जा.) मतदारसंघामध्ये कानडे लहू नाथा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), २२१- नेवासा मतदारसंघामध्ये शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी), २२२-शेवगाव मतदारसंघामध्ये मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), २२३- मतदारसंघामध्ये प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), २२४-पारनेर मतदारसंघामध्ये नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), २२५-अहमदनगर शहर मतदारसंघामध्ये संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), २२६-श्रीगोंदा मतदारसंघामध्ये पाचपुते बबनराव भिकाजी (भारतीय जनता पार्टी) आणि २२७-कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार (नॅशनलिस्‍ट काँग्रेस पार्टी) विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.

बाराही मतदारसंघातील उमेदवारांची नावे, त्यांचे पक्ष आणि त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे –

२१६-अकोले (अ.ज) विधानसभा मतदारसंघ – डॉ.किरण यमाजी लहामटे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-113414-विजयी), पिचड वैभव मधुकरराव (भारतीय जनता पार्टी-55725), दीपक यशवंत पथवे (वंचित बहुजन आघाडी-1817), घाणे भिवा रामा (अपक्ष- ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी-1014) नोटा 2298.

२१७- संगमनेर विधानसभा मतदारसंघ – थोरात विजय उर्फ बाळासाहेब (इंडियन नॅशनल कॉंग्रेस-125380 विजयी), साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना-63128), शरद ज्ञानदेव गोर्डे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना-1182), बापूसाहेब भागवत ताजणे (वंचित बहुजन आघाडी-1897), संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी-249), अविनाश हौशीराम भोर (अपक्ष-451), कालीराम बहिरु पोपळघट (अपक्ष-281), बापू पाराजी रणधीर (अपक्ष-473) नोटा 1692.

२१८-शिर्डी विधानसभा मतदारसंघ – विखे पाटील राधाकृष्ण एकनाथराव (भारतीय जनता पार्टी-132316 विजयी) जगताप शिमोन ठकाजी (बहुजन समाज पार्टी-1043), थोरात सुरेश जगन्नाथ (इंडियन नॅशनल काँग्रेस-45292), , कोळगे विशाल बबन (वंचित बहुजन आघाडी-5788), वाघ विश्वनाथ पांडुरंग (अपक्ष-683) नोटा 1596.

२१९-कोपरगाव विधानसभा मतदारसंघ – आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-87566 विजयी), कोल्हे स्नेहलता बिपीनदादा (भारतीय जनता पार्टीं-86744), माधव सखाराम ‍त्रिभुवन (बहुजन समाजपार्टी-615), कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी-224), कोल्हे शितल दिगंबर (हिंदुस्थान जनता पार्टी -275), अशोक विजय गायकवाड (अपक्ष-3914), अहिरे मगन पांडुरंग (अपक्ष-580), उकिरडे सुदाम पंढरीनाथ (अपक्ष-123), काळे अशोक नामदेव (अपक्ष-244), परजणे राजेश सखाहरी (अपक्ष-246), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष-15446), वहाडणे विजय सूर्यभान (अपक्ष-4047), शाह अलिम छोटु (अपक्ष-337), साळुंके दीपक गणपतराव (अपक्ष-557), नोटा 1622.

२२०- श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ – कानडे लहू नाथा (भारतीय राष्ट्रीय काँगेस-93906 विजयी), अ‍ॅड. अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पार्टी-950), पगारे भाऊसाहेब शंकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना-1647), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना-74912), अशोकराव रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी-658), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी-394), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम-1005), जाधव रामचंद्र नामदेव (अपक्ष-2148), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष-978), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष-336), डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर(अपक्ष-5539), नोटा-2133.

२२१-नेवासा विधानसभा मतदारसंघ – शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी-116943 विजयी) बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (भाजपा-86280), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी-436), सचिन रामदास गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना-268), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया-2046), कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी – -364), मतकर शशिकांत भागवत (वंचित बहुजन आघाडी-1214), गोल्हार रामनाथ गहिनीनाथ (अपक्ष-493), देशमुख विठ्ठल विष्णु (अपक्ष-177), भाऊसाहेब शिवराम जगदाळे (अपक्ष-313), मच्छिंद्र देवराव मुंगसे (अपक्ष-119), राजुबाई कल्याण भोसले (अपक्ष-95), राजेंद्र एकनाथ निंबाळकर (अपक्ष-161), रामदास मारुती नजन (अपक्ष-138), सौ.लक्ष्मी तुकाराम गडाख (अपक्ष-319), विशाल वसंतराव गडाख (अपक्ष-981), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष-919) नोटा 316.

२२२-शेवगाव विधानसभा मतदारसंघ मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी-115509 विजयी), ॲड. प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-98215), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित बहुजन आघाडी-9599), धीरज मोतीलाल बताडे (राईट टु रिकॉल पार्टी-364), सुभाष त्रिंबक साबळे (बहुजन समाज पार्टी-1124), विठठल पांडुरंग वाघ (अपक्ष-489), संदीप गोरक्षनाथ शेलार (अपक्ष-1112), सदाशिव सटवाजी शिंदे (अपक्ष-348), कमरुद्दिन दगडु शेख (अपक्ष-312) नोटा 2186.

२२३-राहुरी विधानसभा मतदारसंघ – प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-109234 विजयी), ‍कडिर्ले शिवाजी भानुदास (भाजपा-85908), कर्डिले राजेंद्र दादासाहेब (अपक्ष-874), चंद्रकांत उर्फ संजय प्रभाकर संसारे (अपक्ष-545), तनपुरे रावसाहेब राधुजी (अपक्ष-565), लांबे सुरेश उर्फ सुर्यभान दत्तात्रय‍ (अपक्ष-1552), विनायक रेवणनाथ कोरडे (अपक्ष-546), नोटा 1892.

२२४-पारनेर विधानसभा मतदारसंघ – नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी- 139963 विजयी), औटी विजयराव भास्‍करराव (शिवसेना-80125), साठे जितेंद्र ममता (बहुजन समाज पार्टी-1019), इंजि. डी.आर. शेंडगे (वंचित बहुजन आघाडी-2499), प्रसाद बापू खामकर (जनता पार्टी-961), भाऊसाहेब माधव खेडेकर (अपक्ष-810), नोटा 1479.

२२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ – संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-81217 विजयी), अनिलभैय्या रामकिसन राठोड (शिवसेना-70078), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (कम्युनिस्ट पार्टी-1046), श्रीपाद शंकर छिंदम (बसपा-2923), संतोष नामदेव वाकळे (मनसे-952), किरण गुलाबराव काळे (वंचित बहुजन आघाडी-2881), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम-6869), प्रतीक अरविंद बारसे (अपक्ष-223), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष-272), सचिन बबनराव राठोड (अपक्ष-167), सुनिल सुरेश फुलसौंदर (अपक्ष-138), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष- 661), नोटा 2724.

२२६-श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ – पाचपुते बबनराव भिकाजी (भारतीय जनता पार्टी-103258 विजयी), घन:शाम प्रतापराव शेलार (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी-98508), सुनिल लक्ष्मण ओहोळ (बहुजन समाज पार्टी-1149), जठार बाळु अप्पा (पीझंटस अॅन्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया-382), टिळक गोपीनाथ घोस (संभाजी ब्रिगेड पार्टी-1195), तात्याराम बलभिम घोडके (बहुजन मुक्ती पार्टी-291), मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित बहुजन आघाडी-3175), प्रमोद बाजीराव काळे (अपक्ष-294), राजेंद्र निळकंठ नागवडे (अपक्ष-326), सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष-267), हरिश्चंद्र पाटीलबुवा पाचपुते (अपक्ष-891), नोटा 1575.

२२७-कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ – रोहित पवार (नॅशनलिस्‍ट कॉंग्रेस पार्टी-135824 विजयी), आप्‍पासाहेब नवनाथ पालवे (महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना-345), प्रा. राम शंकर शिंदे (भारतीय जनता पार्टी-92477), भैलुमे शंकर मधुकर (बहुजन समाज पार्टी-586), अरूण हौसराव जाधव (वंचित बहुजन आघाडी-3849), सोमनाथ भागचंद शिंदे (जनहित लोकशाही पार्टी-393), गोविंद लक्ष्‍मण आंबेडकर (अपक्ष-207), बजरंग मनोहर सरडे (अपक्ष-214), अ‍ॅड. महारुद्र नरहरी नागरगोजे (अपक्ष-386), राम रंगनाथ शिंदे (अपक्ष-2020), अ‍ॅड. पाटील सुमित कन्‍हैय्या (अपक्ष-792), ज्ञानदेव नरहरी सुपेकर (अपक्ष-350), नोटा 867.

Visit : Policenama.com