शिवसेनेचा ढाण्या वाघ भाजपच्या अजगराला घाबरला : डॉ. अमोल कोल्हे

सांगली (तासगाव) : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. भाजप नावाचा एक भला मोठा अजगर सुटला होता. तो जो दिसेल त्याला सीबीआय, ईडीची भीती दाखवून फुत्कार टाकायचा. त्यानंतर त्याने अनेकांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून आपल्या पोटात घेतले. हातात राजीनामा घेऊन फिरणारा ढाण्या वाघ देखील या अजगराच्या पोटात गेल्याची टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. तासगावच्या कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात ते बोलत होते.

पुढे बोलाताना कोल्हे म्हणाले, काही दिवसांनी या अजगराला एक वयस्कर व थकलेला व्यक्ती दिसला. अजगराने पुन्हा फुत्कार सोडत ईडीची भीती दाखवली. मात्र, यानंतर अजगरचं गहिवरला कारण तो 79 वर्षाचा तरुण होता आणि त्याच नाव शरद पवार होतं असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या ईडीच्या कारवाईवर टीका केली.

भाजपच्या महाजनादेश यात्रेवर निशाणा साधताना कोल्हे म्हणाले, भाजपच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी राज्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच पळवले. त्यामुळे पोलिसांच्या मनात देखील भाजपविषयी चीड निर्माण झाली आहे. ते देखील म्हणत असतील तुमची सत्ता जाऊ द्या, मग तुम्हाला खाकी वर्दी दाखवतो असे म्हणत कोल्हे यांनी महाजनादेश यात्रेवर निशाणा साधला. जेव्हा माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील हे होते त्यावेळी 5 वर्षात 65 हजारांची पोलीस भरती होती. हे सरकार 3 हजार पोलीस भरती करणार होते. मात्र ती झाली नसल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like