आमचं ठरलय ! शिवेसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ बिनकामाच्या आमदाराला पाडायचं, सर्वत्र पोस्टरबाजी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात हि निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपूरमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत.

या बॅनरमध्ये सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, तसेच थोरात साहेबांना फसविणाऱ्या गद्दार आणि बिनकामाच्या आमदाराला पाडायचं, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आता नाराज शिवसैनिकांना एकत्रित करून निवडणूक जिंकणे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी दिव्य आहे. मात्र अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या या बॅनरची सध्या शहरभर चर्चा सुरु असून शिवसेनेतील गटबाजी आणि नाराजी यामुळे पुन्हा वर आलेली दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य दुकानदार ते आमदार असा प्रवास झालेल्या भाऊसाहेब कांबळे यांना यावेळी हि निवडणूक अवघड जाणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विखे पाटलांच्या साहाय्याने त्यांनी या मतदारसंघात आपले वजन निर्माण केले. मात्र नगरपालिका निवडणुकीत त्यांनी साथ न दिल्याने ससाणे गट देखील त्यांच्यावर नाराज झाला. त्यामुळे त्यांनी देखील कांबळे यांना यावेळी विरोध केला आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देखील त्यांना आघाडी मिळवता आली नाही. त्यामुळे या निवडणुकीत ते हा विरोध मोडून विजय साजरा करतात कि नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like