भोसरी मतदारसंघात महेश लांडगे Vs विलास लांडे !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यात सामना होणार आहे. भोसरीच्या लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागले असून 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भोसरी मतदारसंघात 2009 मध्ये अपक्ष लढलेले विलास लांडे यांना पहिला आमदार होण्याचा मान मिळाला. तर, 2014 च्या निवडणुकीवेळी महेश लांडगे अपक्ष निवडून आले. त्यामुळे सलग दोन निवडणुकीत भोसरीकरांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्विकारण्यास विलास लांडे यांनी नकार दिला. लांडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने त्यांना पुरुस्कृत केले आहे.

महेश लांडगे कामाच्या जोरावार निवडणुकीला सामोरे जात आहेत. विलास लांडे यांनी देखील बैठका सुरु केल्या आहेत. लांडे अपक्ष निवडून येण्याचा चत्मकार करतात की लांडगे भाजपकडून निवडून येतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

भोसरी मतदार संघात भाजपचे महेश लांडगे, अपक्ष विलास लांडे, समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख, बीआरएसपीचे ज्ञानेश्वर बोऱ्हाटे, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख, महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊ अडागळे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र पवार, अपक्ष हरेश डोळस, छाया जगदाळे, मारुती पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, डॉ. मिलिंदराजे भोसले, विष्णू शेळके, महेश तांदळे यांनी माघार घेतली आहे.

Visit : Policenama.com