काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर संपुर्ण जग आपल्या सोबत : अमित शहा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह राज्यात दाखल झाले आहेत. सांगली सभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितले की मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. त्यानंतर आज संपूर्ण जग आपल्या सोबत आहेत. कलम 370 वर काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने वोट बँकचा विचार करुन विरोध दर्शवला. 370 रद्द करुन आम्ही देशाला जोडण्याचा प्रयत्न केला तर एनसीपी, काँग्रेसने याला विरोध केला.

अमित शाह म्हणाले जेव्हा पंतप्रधान मोदींनी कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव आणला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने कलम 370 रद्द करण्यास मोदींना विरोध केला. मी राहूल गांधी आणि शरद पवारांना विचारु इच्छितो की त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांना सांगावे की ते 370 कलम रद्द केल्याचा विरोधात आहे की नाहीत.

21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा
राज्यात 21 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने निवडणूका घोषित केल्या आहेत. 24 तारखेला मत मोजणी आहे. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे.

काय बोलले अमित शाह
1. राज्यात निवडणूकीची घोषणा झाली आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूका लढल्या जात आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या कौटूंबिक पक्ष निवडणूक मैदानात असेल.

2. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने मोदींना साथ दिली. यामुळे मोदी पंतप्रधान झाले आणि 300 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळून भाजप बहुमताने सत्तेत आले.

3. पंतप्रधान मोदींनी कलम 370 रद्द करुन देशातील दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण समाप्त केले आणि देशाला अखंड बनवण्याचे काम केले. आता अखंड भारताचा सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण झाले.

4. स्वतंत्र होताना उद्योगात, शेतीत, सिंचन क्षेत्रात, दुध उत्पादनात महाराष्ट्र नंबर 1 होता, त्यानंतर 15 वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने महाराष्ट्रचा क्रमांक खाली घसरला. परंतू मागील 5 वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले.

5. मी राहुल गांधी यांनी सांगू इच्छितो की जर शिव्या द्याच्या असतील तर मला द्या, माझ्या पक्षाला द्या, पंतप्रधान मोदींना द्या आम्ही काही बोलणार नाहीत.

6. परंतू तुम्ही भारत मातेचे तुकडे करणाऱ्यांच्या सोबत उभे राहत असाल तर असा विचार करणाऱ्यांना तुरुंगात धाडण्याचे काम आमचे सरकार करेल.

2014 ला विधानसभेत भाजपनेच मिळवला होता विजय
2014 साली राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपला 122 जागांवर विजय मिळाला होता. भाजपने पहिल्यांदाच राज्यात इतक्या जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 42 जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना 62 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर होती. तर राष्ट्रवादीला फक्त 41 जागांवर विजय मिळवता आला होता.

2014 साली 63.08 टक्के मतदान झाले होते, एकूण 5,26,91758 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. ज्यात 2,83,08397 महिला आणि 357 थर्ड जेंडर मतदार होते.

visit : policenama.com 

You might also like