विधानसभा निवडणुकीत भाजप 25 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करणार !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे जागावाटप कधी संपते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यात आचारसंहिता कधी लागणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

त्याचबरोबर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची अजूनही घोषणा झालेली नाही. मात्र भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून विद्यमान आमदारांपैकी जवळपास 25 आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तारखा जाहीर होण्याआधीच या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार याकडे या सर्व आमदारांचे लक्ष लागून आहे.

त्याचबरोबर कोणत्या आमदाराला याचा फटका बसतो हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभेत देखील भाजपने काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापून त्यांना धक्का दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास 8 विद्यमान खासदारांचे तिकीट भाजपने कापले होते. तसाच पॅटर्न देखील विधानसभा निवडणुकीत वापरण्याचा भाजपचा विचार आहे.

काय आहे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत

लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या प्रचंड विजयानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे आता त्यांनी कंबर कसून तयारी सुरु केली आहे. जर युती झाली तर कोणत्या जागा लढवायच्या आणि युती नाही झालीतर कोणत्या जागांवर त्यांचे प्राबल्य आहे याकडे देखील त्यांचे लक्ष लागून आहे. भाजपच्या या अंतर्गत सर्व्हेत भाजप युतीमध्ये लढल्यास त्यांना 229 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता ते नेमके किती जागा जिंकतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

visit : Policenama.com 

You might also like