विधानसभा 2019 : निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांचा वापर करत आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून खर्चाचे बंधन असते. 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवाराने केलेल्या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघात 14 ऑक्टोबर पर्यंत निवडणूक खर्च करण्यात भाजप पक्ष सर्वात पुढे आहे. भाजप उमेदवाराने सर्वात जास्त खर्च केला आहे. भाजपनंतर वंचित बहुजन आघाडीचा दुसरा क्रमांक लागतो. तर काँग्रेसचा तिसरा क्रमांक लागतो.

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 12 उमेदवारांकडून 14 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाची माहिती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या खर्चविषयक पथकाकडे सादर करण्यात आली आहे. यानुसार भाजपचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वाधीक खर्च असून त्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत 5 लाख 95 हजार 559 रुपये निवडणूक खर्च केला आहे. त्यांच्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार हरिदास भदे यांनी 5 लाख 75 हजार 750 रुपये खर्च केले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार विवेक पारसकर यांनी 4 लाख 97 हजार 146 रुपये खर्च केले आहेत.

उमेदवारांनी केलेला निवडणूक खर्च
रणधीर सावरकर (भाजप) 5 लाख 95 हजार 559, हरिदास भदे (वंचित बहुजन आघाडी) 5 लाख 75 हजार 750 रुपये, विवेक पारसकर (काँग्रेस) 4 लाख 97 हजार 147 रुपये, शेषराव खडसे (बसपा) 17 हजार 215 रुपये,  प्रीती सदाशिव (आरपीआय-सोशल) 33 हजार 314 रुपये, निखील भोंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमोक्रॅटिक) 6 हजार 350 रुपये, प्रफुल्ल उर्फ प्रशांत भारसाकळ (संभाजी ब्रिगेड पार्टी) 13 हजार 638 रुपये, हर्षल सिरसाट (बहुजन मुक्ती पार्टी) 14 हजार 480 रुपये, अजाबराव ताले (अपक्ष) 80 हजार 120 रुपये, अनिल कपले (अपक्ष) 34 हजार 534, महेंद्र भोजने (अपक्ष) 29 हजार 180 रुपये निवडणूक खर्च आहे.

खर्च सादर न करणाऱ्यास ‘शो-कॉज’ नोटीस
अकोला पूर्व मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय आठवले यांनी 14 ऑक्टोबर पर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाची माहिती सादर केली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यामार्फत त्यांना दोनदा कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी