भाजपातील बंडखोरांमुळं शिवसेनेचे ‘या’ 2 ठिकाणचे उमेदवार अडचणीत

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – युती झाल्यानंतर अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोनीही पक्षांना बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि वसमत या दोनीही मतदार संघामध्ये भाजपच्या नेत्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने बंडखोरी केली आहे.

या दोनीही मतदारसंघामध्ये शिवाजी माने आणि गजानन घुगे यांनी भाजपची ताकद वाढवली कार्यकर्त्याची मोठी फळी निर्माण करून विधानसभेची तयारी देखील केली मात्र युती झाली आणि शिवाजी माने आणि गजानन घुगे यांचा हिरमोड झाला. अखेर नाराज झालेल्या या दोघांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्या अडचणीत या बंडखोरांमुळे मोठी वाढ झाली आहे. या दोन दिग्गज नेत्यांनी जर उमेदवारी मागे घेतली नाही तर याचा फटका संतोष बांगर यांना बसण्याची शक्यता आहे.

युतीमध्ये वसमत मतदारसंघ शिवसेनेने विद्यमान आमदार जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या शिवाजी जाधव यांनी भाजपशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या दोनीही मतदार संघातील भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेच्या अडचणीत चांगली वाढ होणार आहे. बंडखोरांना थांबवण्यात युती अयशस्वी झाली तर या दोनीही जागांवर बदल घडू शकतो.

 

Visit : Policenama.com