अखेर ठरलं ! भाजप मोठा भाऊ, ‘हा’ असणार भाजप-सेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप-शिवसेना जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे दिसत आहे. अखेर गणित जळलं आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा करण्यात येणार आहे. आगामी विधानसभेच्या जागावाटपात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. कारण आगामी निवडणुकीत भाजप 162 जागांवर तर शिवसेना 126 जागांवर लढणार आहे. इतकेच नाही तर उर्वरीत जागा या मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील. शिवसेनेव्यतिरीक्त इतर मित्र पक्ष कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे असे बोलले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेत जागावाटपादरम्यान 12 जागेंवरून वाद सुरु होता. यानंतर दोन्ही पक्षातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. त्यामुळे जागावाटपाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला होता. यानंतर केवळ 5 विधानसभा मतदासंघाचा तिढा सोडवणं बाकी होतं अखेर हाही तिढा सोडवण्यात आला आहे.

आगामी विधानसभेपूर्वी भाजप आणि सेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. यानंतर दोन्ही पक्षातील स्थिती बदलली होती. जागावाटपादरम्यान युती तुटेल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी दोन्ही पक्षांनी घेतली. इनकमिंगनंतर बदलेल्या परिस्थितीमुळे काही अडचणी आल्याने जागवाटपासाठी विलंब झाला असे समजत आहे.

‘या’ 5 जागांवर अडलं होतं भाजप-सेनेचं घोडं

1) उल्हासनगर- ठाणे

2) ऐरोली- ठाणे

3) वडाळा- मुंबई

4) बेलापूर- ठाणे

5) औसा- लातूर

Visit : policenama.com