‘या’ पक्षाचा होणार मुख्यमंत्री : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच भाजप पक्षालाच जास्त जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उल्हासनगरमध्ये झालेल्या एका जाहिर सभेत ते बोलत होते.

राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मीच येणार असल्याचा दावा केलेला असताना, दुसरीकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचा वारंवार उल्लेख शिवसैनिकांकडून केला जात आहे. या सर्व चर्चांवर रामदास आठवले यांनी आपले मत मांडले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, ‘आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या जागा सर्वाधिक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. भाजपलाच जास्त जागा मिळतील आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं, असेही म्हटलं. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत मी उभा आहे त्यामुळे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. ‘

तसेच जागावाटपात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like