राष्ट्रवादीतील वाद चव्हाटयावर ! अजित पवारांच्या ‘राजीनाम्यावर’ भुजबळांची ‘स्फोटक’ प्रतिक्रीया

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्फोटक विधान केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपल्याचे पहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेच्या विषयावरून छगन भुजबळ यांनी विभाग प्रमुखांच्या हट्टामुळे करवाई करावी लागली असल्याचे सांगत त्यांच्यावरच खापर फोडलं.

अजित पवारांच्या राजीनाम्याने ‘फोकस’ बदलला –

अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या जखमेवर बोट ठेवले. ते म्हणाले, शरद पवार ज्या दिवशी ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला, अशा शब्दात भुजबळांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. छगन भुजबळ हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मात्र संपताना दिसत नाहीत.

नेमकं काय म्हणाले भुजबळ ? –

ज्या दिवशी शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते. त्याच दिवशी अजित पवार यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. बँकेचे सदस्य आणि संचालक नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले. पण काही वेळाने वातावरण बदललं आणि फोकसही बदलला. अजित पवार भावनाप्रधान आहेत हे मान्य आहे. पण दोन दिवस भावना आवरल्या असतं तर बरं झालं असतं, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता –

बाळासाहेबांच्या अटकेबाबात बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, बाळासाहेबांना अटक करण्यात मला आनंद नव्हता. मी त्यांना जेलमध्ये पाठवणार नव्हतो, शक्य झालं नाही तर त्यांना मातोश्रीवरच ठेवणार होते. पण त्यांना त्रास द्यायचा नव्हता अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी