मागील 5 वर्षात मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत 107 % वाढ, जाणून घ्या CM यांची संपत्ती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सव्वा चार कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात त्यांची संपत्ती तब्बल 107 टक्क्यांनी वाढली आहे. जमिनींच्या बाजारमुल्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या वाढीमुळे अचल संपत्तीत वाढ झाली आहे.

मागील निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 23 लाख 630 रुपयांची चल संपत्ती तर 1 कोटी 81 लाख 10 हजार 500 रुपयांची अचल संपत्ती होती. त्यांची एकूण संपत्ती 2 कोटी 14 हजार 130 रुपयांची होती. 2019 मध्ये ही संपत्ती 4 कोटी 24 लाख 23 हजार 634 रुपयांवर पोहचली आहे. पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 2 कोटी 20 लाख 9 हजार 504 रुपयांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत त्यांच्याकडे 45 लाख 94 हजार 634 रुपयांची चल तर 3 कोटी 29 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.

पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे 3 कोटी 39 लाख 58 हजार 741 रुपयांची चल तर 99 लाख 39 हजारांची अचल संपत्ती आहे. 2014 मध्ये त्यांच्याकडे 2 कोटी 30 लाख 71 हजार 206 रुपयांची संपत्ती होती. त्यांच्या संपत्तीमध्ये 90.27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये त्यांच्या पाच वर्षातील वेतन वाढीचा परिणाम आहे.

visit : Policenama.com