राधाकृष्ण विखे पाटलांच्या उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक अधिकार्‍यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर काँग्रसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली होती. हरकतीवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा निर्णय शिर्डी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (दि.4) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी घेतलेल्या हरकतीमध्ये, विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीवर आज (शनिवार) दुपारी तीन वाजता सुनावणी झाली. त्यानंतर विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, हे अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली होती. विखे पाटील यांनी ज्या वकिलाकडे हे प्रमाणपत्र घेतले आहे त्या वकिलाचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्ये संपला असल्याचा दावा थोरात यांनी केला होता. याबाबत लेखी तक्रार शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती.

visit : Policenama.com