काँग्रेसच्या पहिल्या यादीत ‘या’ 20 दिग्गजांचा समावेश !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या यादीमधील काही नावे लीक झाली असून यामध्ये मोजके अपवाद वगळता सर्व उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आज दिल्लीत सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत या दिग्गज नेत्यांच्या नावाची चर्चा झाली.

बैठकीनंतर माहिती देताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, 45 जागांवर चर्चा झाली, त्यापैकी 35 जागांचा आज निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 50 जागांचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे 85 जागांवरचे उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीला राज्यातले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

ही आहे काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी
बाळासाहेब थोरात (संगमनेर )
अशोक चव्हाण (भोकर)
विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी)
डी. पी. सावंत (नांदेड)
वसंत चव्हाण (नायगाव, नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
वर्षा गायकवाड (धारावी)
प्रणिती शिंदे (मध्य-सोलापूर)
नसीम खान (चांदीवली)
यशोमती ठाकूर (तिवसा)
के. सी. पडवी (अक्कलकुवा)
संग्राम थोपटे ( भोर )
संजय जगताप (सासवड)
वीरेंद्र जगताप (धामनगाव)
सुनील केदार (सावनेर)
अमीन पटेल (मुंबादेवी)
बसवराज पाटील (औसा)
विश्वजित कदम (भिलवडी)
भाई जगताप (कुलाबा)