भाजपाचे ‘हे’ विद्यमान मंत्री पराभवाच्या छायेत तर छगन भुजबळ विजयी, ‘हा’ नवा EXIT POLL 17 मतदार संघाचा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका मागून एक एक्झिट पोल प्रसिद्ध होत असताना निवडणूकींच्या निकालाचा एक नवा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलने सत्ताधारी भाजपला धक्का लागण्याची शक्यता आहे. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार आणि भाजपच्या राम शिंदे यांच्यात काटे की टक्कर असणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे रोहित पवार बाजी मारतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या एक्झिट पोलनुसार राम शिंदे यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

तर इंडिया टूडेच्या एक्झिट पोल नुसार यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या सर्व्हेनुसार भाजप जास्त जागा जिंकेल अशी शक्यता आहे. परंतू या नव्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. नव्या एक्झिट पोल नुसार भाजपला 109 – 124 जागा मिळू शकतात, तर शिवसेनेला 57 – 70 च्या आसपास जागा मिळू शकतात. काँग्रेसला 32 – 40 जागा मिळण्याची शक्यता आहे.

या नव्या एक्झिट पोलनुसार या 16 महत्वाच्या VIP मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

1. येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा विजयी होण्याची शक्यता.

2. आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विजयी होण्याची शक्यता.

3. परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे या विजयी होती असा अंदाज.

4. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी होण्याची शक्यता.

5. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छनग भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ जिंकण्याची शक्यता.

6. मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपच्या एकनाथ खडसे यांच्या मुलगी रोहिनी खडसे यांचा विजय होण्याची शक्यता.

7. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजयी होण्याची शक्यता.

8. लातूर ग्रामीण मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे पुत्र काँग्रेसचे धिरज देशमुख जिंकण्याची शक्यता.

9. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे बाजी मारण्याची शक्यता.

10. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे विजयी होणार असल्याचा अंदाज.

11. लातूर शहर मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे पुत्र काँग्रेसचे अमित देशमुख जिंकण्याची शक्यता.

12. सोलापूर मध्य मतदारसंघातून सुशिलकुमार शिंदे यांच्या मुलगी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी होण्याची शक्यता

13. कणकवली मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचा भाजपमधून विजय होण्याची शक्यता.

14. मुंबईच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विजयी होतील असा अंदाज.

15. जामनेर मतदारसंघातून भाजपचे गिरीष महाजन हे विजयी होतील असा अंदाज.

16. नागपूर दक्षिण पूर्व मतदारसंघामधून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजी मारतील.

आता विधानसभा निवडणूकीचा निकाल जवळ येऊन ठेपला आला. उद्या म्हणजेच 24 ऑक्टोबरला जनमत जाहीर होईल. त्याआधी मात्र एक्झिट पोलच्या माध्यमातून कोण बाजी मारणार अशी चर्चा आहे. एक्झिट पोलमधून भाजप सेनेला बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. परंतू VDPA दिलेल्या अंदाजानुसार भाजप सत्ता गमावणार अशी शक्यता आहे. 6 एक्झिट पोलने भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवली आहे. सत्तेत येण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. परंतू VDPA च्या अंदाजानुसार भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज आहे. यात वंचित आणि मनसे आपली खाती खोलणार असल्याचा अंदाज आहे.

VDPA चा नवा EXIT POLL 

भाजप – 126 -135

शिवसेना – 79 – 88

राष्ट्रवादी – 33 – 43

काँग्रेस – 16 – 26

वंचित बहुजन आघाडी – 2 – 5

मनसे – 1

इतर – 5 -13

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like