Exit Poll : चंद्रकांत पाटील कोथरूडचं ‘मैदान’ मारणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यानुसार राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीत युती बाजी मारणार असे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत सेना-भाजपच्या युतीला 192 ते 2016 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजीनाट्य रंगले होते. त्यातच बंडोखोरी आणि नाराजी दूर करण्यात यश आल्याने चंद्रकांत पाटील यांच्या बाजून या ठिकाणचे वातावरण तयार झाले होतं. आज जाहिर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी होतील असा अंदाज वर्तवला आहे.

पुण्यातील कोथरूड मतदार संघात चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे आव्हान होते. पुण्यात कसबा इथं राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. तर मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता त्यामुळेच ही लढत रंगतदार झाली होती. महायुतीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 1 लाख 60 हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like