भाजपात जातीचं राजकारण कधीपर्यंत चालेल, BJP कार्यकर्त्यांचा ‘सवाल’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपतर्फे उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली. यामध्ये नाराज झालेल्या उमेदवारांच्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. नागपूर मध्यमधून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटकेंना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले असून दटके यांना उमेदवरी न दिल्याच्या निषेधार्थ जातीचे राजकारण कधी पर्यंत चालेल असे निषेधाचे बॅनर दटके समर्थकांनी झळकवले आहेत.

विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे बडकस चौकावर निषेधाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. जातीचं राजकारण कधीपर्यंत चालेल असा प्रश्न यातून विचारण्यात आला आहे. आपण 21 व्या शतकाच्या गोष्टी करतो आणि आपणच जातीवर उमेदवार उभे करतो असा प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आला आहे. तसेच बडकस चौकावर  मोर्चाही काढण्यात आला.

आमदारांच्या आणि इच्छुकांच्या नाराजीमुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू झाल्याने भाजपची डोकोदुखी वाढली आहे. यावर आता भाजप श्रेष्ठी काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

भाजप उमेदवरांच्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील 12 जागापैकी 9 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये 7 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com