कष्टकरी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी : मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘गेली अनेक वर्षे आपण आपल्या हक्कांसाठी आणि मागण्यांसंदर्भात भांडत आला आहात. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्या पासून अनेक प्रश्न सोडविले गेले आहेत. यापुढील काळात कष्टकरी समाजाच्या सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेण्याचे धोरण आम्ही कायम ठेवू, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष – शिवसेना – रिपाईं, रासप महायुतीच्या कसबा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांनी केले.

भवानी पेठेत विडी कामगार महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपाईंचे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘विडी कामगार महिलांच्या मागण्यांसंदर्भात या सकारात्मक असून यात मार्ग काढण्यात येत आहे. सरकारने महिलांसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. सरकारने महिलांच्या समस्या सोडवण्यात भर दिला आहे.’, असे टिळक यावेळी म्हणाल्या.
Bhavani Peth
किमान वेतन, पेन्शन, आरोग्यसुविधा, मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा आदिंच्या माध्यमातून कष्टकरी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यापुढील काळात सर्व नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याचे धोरण पक्षाने नुकतेच जाहीर केले आहे. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत ही धोरणे राबवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी हमी मुक्ता टिळक यांनी दिली.

विकासाच्या मुद्द्यावरच प्रचारात भर
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचणं यावरच आपल्या प्रचारात भर देत आहे अशी माहिती भाजप-शिवसेना आरपीआय महायुती च्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ता टिळक यांनी दिली.

प्रचाराचा आढावा घेण्यासाठी मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीचे कसबा मंडळ अध्यक्ष राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, आरपीआयचे मंदार जोशी, शिवसेनेचे विनायक धारणे, नगरसेवक धीरज घाटे आणि हेमंत रासने आदी यावेळी उपस्थित होते.

महिला स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याबाबत आपण यापूर्वीच मिशन मोड कार्यक्रम घेतले आहेत. तसेच वाडे पुनर्विकास, रस्ते रुंदी, वाहतूक सुधारणा आणि मेट्रो स्मार्ट सिटी आधी प्रकल्पांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघाचा आपण चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत अशी माहिती मुक्ता टिळक यांनी दिली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी