कोथरूडमध्ये किशोर शिंदेंचा ‘गौप्यस्फोट’ ! उमेदवारी मागे घेण्यासाठी ‘राज्यमंत्री’ पद, 20 कोटी आणि 200 कोटींच्या कंत्राटाचे आमिष दाखवलं (व्हिडिओ)

कोथरूड : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी मला राज्यमंत्रीपद, २० कोटी रुपये आणि पीडब्ल्यूडीचे २०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे अमिष दाखविले. सांगलीतून आलेला एक गुंड शहरातील गुंडांना हाताशी धरून कोथरूडमधील झोपडपट्टीवासियांना धमकवायला सांगत आहे. कोथरूडमध्ये पैशाचा महापूर आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा हक्क हिरावून घेवून कोथरूडकरांना गृहीत धरले जात आहे. कोथरूडकरांना गृहीत धरून त्यांचा स्वाभीमान चिरडण्याचे काम कोथरूडचे भाजप- शिवसेना- रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत पाटील करत आहेत, असा गौप्यस्फोट आज मनसे आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी केला आहे.

अ‍ॅड. शिंदे यांच्या प्रचारार्थ कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. याप्रसंगी अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला. अ‍ॅड. शिंदे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. मी येथील स्थानिक आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी स्थानिक आहेत. यापुर्वी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आमदार होते, तेही स्थानिक होते. नागरिक आमच्याकडे थेट तक्रारी घेउन येत होते. परंतू पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या आकांक्षा चिरडून येथून उमेदवारी घेतली. काम असेल तर नागरिक त्यांना शोधणार कोठे? बरेतर ते कोथरूड मध्ये घर घेतल्याचे सांगतात, ते खडकवासला मतदारसंघात आहे. त्यांना कोथरूडची भौगोलिक माहिती नाही, त्यांना येथील समस्या माहिती नाहीत. परंतू केवळ सत्ता हव्यासापायी आम्हा कोथरूडकरांना गृहीत धरत आहेत. पाटील यांना निवडून आणण्यासाठी पोलिस आणि गुंडांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. कोथरूडकरांना स्वाभीमान नाही, हे गृहीत धरले जात आहे.

कोथरूडमधून तीन आमदार होतील
चंद्रकांत पाटील यांच्या विधान परिषदेचा आणखी एक वर्षाचा कालावधी आहे. विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे कोथरूडकरांनी मला आमदार करावे. आम्ही कोथरूडचे तीन आमदार मिळून कोथरूडच्या समस्या निश्‍चितपणे सोडवू, अशी गुगली टाकत अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी कोथरूडकरांना भावनिक आवाहन केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी