काय सांगता ! भाजपच्या ‘या’ नेत्यानं शिवसेनेच्या मतदार संघात केली स्वतःचीच उमेदवारी जाहीर, पुढं ‘काय’ होणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे जागावाटप कधी संपते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यात आचारसंहिता कधी लागणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

मात्र त्यात आता कोल्हापूरचे भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी आपली उमेदवारी घोषित केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सध्या युतीच्या जागावाटपात कागलचा हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने घाटगे यांनी आपली उमेदवारी घोषित केल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली असून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे आता जागावाटपात हि जागा शिवसेनेकडेच राहते कि भाजपकडे जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर जागावाटपाआधीच उमेदवारी घोषित केल्याने भाजप आणि शिवसेनेत या जागेवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान
सध्या कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आमदार असून या ठिकाणी भाजप विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर हा मतदारसंघ जरी शिवसेनेच्या वाट्याला असला तरी अनेक दिवस भाजप या मतदारसंघावर दावा करत आहे. त्यामुळे यावेळी हसन मुश्रीफ यांच्यासमोर घाटगे आव्हान उभे करतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच हसन मुश्रीफ यांच्यावर नुकतेच आयकर विभागाने छापे मारले होते. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश न केल्याने त्यांच्यावर सूड उगवण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येत आहे.