कोथरूडमधील वाड्या-वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार : चंद्रकांत पाटील

पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विक्रमी वेगाने विकसित झालेल्या कोथरूडला अद्ययावत नागरी सुविधा पुरवण्यावर आगामी सरकारचे प्राधान्य असेल. त्यामध्ये कोथरूडमधील वाड्या-वस्त्याचा चेहरामोहरा बदलण्यावर आम्ही भर देऊ. समाजातील अखेरचा नागरिकाला सर्वोत्तम सुविधा देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
Chandrakant Patil
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये आयोजित पदयात्रेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाडी-वस्तीमध्ये फटाक्याच्या आतिषबाजीने ठिकठिकाणी दादांचे स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.

पौडरोड वरील किनारा हॉटेल येथून पदयात्रेस सुरुवात झाली. ही पदयात्रा दक्षिण मारुती मंदिर, म्हातोबा नगर, सिव्हील क्रिस्ट, समर्थ कॉलनी, सुतारदरा, शिवकल्याण नगर, स्वराज्य कॉलनी, दत्तनगर, क्रांतीसेना चौक, पांडुरंग कॉलनी, नळ चौक, शेफालिका सोसायटी, एकता सोसायटी, सुनिता पार्क, शिवतीर्थ गणपती मंदिर, रोहन कॉर्नर, तिरंगा मित्रमंडळ चौक, लिला पार्क, जयभवानी नगर, समाजसुधारक मंडळ, पुष्प नगरी, सरस्वती हाईट़स, खंडोबा माळ, रामबाग विकास मंडळ आदी परिसरातून ही पदयात्रा मार्गस्थ झाली, तर श्रीराम हाईट़स येथे या यात्रेचा समारोप झाला. जागोजागी नागरिकांनी फटाक्याच्या आतिषबाजीने या यात्रेचे स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.

Visit : Policenama.com