केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाग घेतला.
कोथरूड परिसरातील विविध क्षेत्रातील नामवंतांबरोबर त्यांनी संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती दिली.

“संवाद प्रज्ञावंतांशी” या कार्यक्रमात जावडेकर सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जावडेकर यांनी उपस्थितांना दिली. यामध्ये जीएसटी महसूल, उद्योगधंद्यांची आजची स्थिती, पर्यावरण आणि विकासाची सांगड अशा एकूणच विकास पर्वाबद्दलची माहिती दिली. गेल्या पाच वर्षातील कामगिरी आणि या दुसऱ्या पर्वातील झालेली कामे यांचा त्यांनी लेखाजोखा मांडला. पुणे शहरात देखील मेट्रो बरोबरच अनेक बाबी येत्या काही दिवसात दिसतील असेही ते म्हणाले.

उपस्थितांशी संवाद साधल्यानंतर प्रश्नोत्तरांद्वारे त्यांनी हा कार्यक्रम अधिकच खुलवला. यावेळी उपस्थितांमध्ये संगणक तज्ञ, चार्टर्ड अकाऊंटस्, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक तसेच रोटरी, लायन्स क्लबचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा पुणे शहराचे उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी केले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, ॲड. मिताली सावळेकर, ॲड. प्रणव शेठ, लायन जितेश शेठ, सौ. देवगावकर, ॲड. नवनाथ लाड, ॲड. वर्षा ढाळे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रसाद आंबिकर यांनी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी