तरुणांचा एकच निर्धार, अब की बार चंद्रकांत दादाच कोथरूडचे आमदार

चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बालेवाडी बाणेर परिसरात आयोजित बाईक रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित बाईक रॅलीला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे झेंडे हातात घेऊन रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात चंद्रकांत पाटील दिवसेंदिवस आपली पकड घट्ट करीत आहेत.
Chandrakant Patil
महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बालेवाडी येथील कार्यालयापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली. बालेवाडी गाव, बाणेर गाव, पासपोर्ट भवन, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण गाव, शिवाजी पुतळा इथून ही रॅली मार्गस्थ झाली. तर सोमेश्वर मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने झेंडे हातात घेऊन या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर ठिकठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजीने पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Chandrakant Patil
या रॅलीत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर, नगरसेविका ज्योतिताई कळमकर, स्वप्नाली ताई सायकर यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. पाषाण भागातील श्री. सोमेश्वर मंदिर परिसरात रॅलीचा समारोप झाला. यावेळी पाटील यांनी भगवान महादेवांची मनोभावे पूजा करुन, विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयासाठी महादेवांना साकडं घातलं.
Chandrakant Patil
टीम इंडियाकडून ही दादांना शुभेच्छा
बाईक रॅली बाणेर रोडवरून जात असताना, पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या कसोटीतील खेळ संपवून टीम इंडिया बसमधून मुक्कामी हॉटेलवर जात होती. यावेळी टीम इंडियाला पाहून रॅलीतील तरुणांनी मोठा जल्लोष केला. या जल्लोषाला प्रतिसाद देत टीम इंडियाकडून पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर पाटील यांनी देखील टीम इंडियाला कसोटी विजयासाठी व्हिक्टरी निशाणी दाखवून प्रतिसाद दिला !

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी