काँग्रेसच्या काळात कलाकारांची फक्त अवहेलनाच झाली : टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज नटरंग अकादमीच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवार मुक्ताताई टिळक बोलत होत्या.

‘नटरंग अकादमी’ सारख्या अनेक लहान मोठ्या संस्था उभ्या केल्या, मोठ्या केल्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला साधे मानपत्रही आघाडी सरकारच्या काळात दिले नाही. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण तसेच केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. या सरकारला कलाकारांची खरी जाण आहे. म्हणूनच गायक, कलाकार त्याचप्रमाणे तिकीट खिडकी वर काम करणाऱ्या माणसाला सुद्धा सन्मानित केले गेले.

कलाकारांचा आम्ही सन्मान करतो. भविष्यकाळात गदिमा यांचे स्मारक पुण्यात करण्याचा मानस आहे. तसेच लवकरच प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचे स्मारक बाणेर येथे सुरू होणार आहे. पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ते कचरा मुक्त कसे होईल याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. या वेळी साईनाथ मंडळ, बालरंगभूमी परिषद, नाट्य संस्कार अकॅडमी, कसबा संस्कार केंद्र, अन्नपूर्णा बचत गट, भारतीय जनता कला अकॅडमी यांच्या वतीने मुक्ता टिळक यांचा सत्कार झाला.

मतदारसंघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे, स्थानिक नगरसेविका गायत्री खडके, मतदारसंघाचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, आर पी आयचे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, शिवसेनेचे विनायक धारणे यांच्या सह जतीन पांडे, राजू परदेशी उपस्थित होते.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी