विकास आणि सुराज्यासाठी महायुती कटिबद्ध : मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘पुण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती कटिबद्ध आहे. विकास आणि सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही ‘ सर्वतोपरीने प्रयत्न करू, अशी ग्वाही कसबा विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. मुक्ता शैलेश टिळक यांनी दिली.

मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचारार्थ कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजप, शिवसेना, रिपाईचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले मंडई येथून कोपरा सभांना सुरुवात झाली. विविध २६ ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या.

या सभांमध्ये टिळक म्हणाल्या, महिलांसाठी स्वच्छता गृह, रस्ते पार्किंग, वाडे पुनर्विकास, वारशाचे जतन, पाणी योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास भरारी कायम ठेवणार आहे. महापौर पदाच्या कारकिर्दीत गेल्या अडीच वर्षात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तेच विकासाची धडाडी आमदार म्हणूनही कायम ठेवीन, असे आश्वासन मुक्ताताई टिळक यांनी दिले.

मंडई कट्ट्यावर मुक्ता ताईंची सरशी
कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी अखिल मंडई निवडणूक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कसबा २.० या आपल्या संकल्प पत्राचे प्रभावी सादरीकरण करुन मुक्ता शैलेश टिळक यांनी बाजी मारली.

समारोपाला झंझावाती संवाद रॅली
अतिशय उत्साहात आणि नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडलेल्या प्रचाराचा समारोप झंझावाती संवाद रॅलीच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत समारोपाची सभा होईल.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी