तिरंग्यात हिरवा रंग असल्याचे ओवैसींनी सांगितले, पुढं म्हणाले – ‘मला हिरवा साप म्हणतात उध्दव ठाकरे, पण मी हॅन्डसम’

नवी दिल्ली : वृत्तसंथा – एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेसाठी नांदेडमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांवर देखील टीका केली आहे. तसेच राम मंदिराबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, मला माहित नाही काय निर्णय लागेल मात्र असा निर्णय लागावा ज्याने कायद्याला अजून बळकटी मिळेल. कारण बाबरी मस्जिद पडणे ही कायद्याची थट्टा होती. तसेच बाबरी पडली त्यावेळी सत्तेत कोण होते ? असा सवाल देखील ओवेसी यांनी यावेळी विचारला.

ओवेसी यांनी विचारले की बाबरीचे कुलूप कसे उघडले ? तसेच न्यायाधीशांनी एका माकडाला पाहून आपला निर्णय दिला याची सुद्धा नोंद आहे. त्यामुळे असा निर्णय देतात का हा सवाल देखील ओवेसींनी यावेळी विचारला.

मते खाल्ल्याचा आरोप चुकीचा
एमआयएम वर फक्त मते खाण्याचा आरोप वारंवार करण्यात आला आहे. मात्र नांदेडमध्ये बोलत असताना ओवेसींनी याला पूर्णपणे नकार दिला आहे. ओवेसी म्हणाले आमच्या पक्षावर सतत मते खाण्याचा आरोप केला जातो मात्र राहुल गांधी अमेठी मधून निवडणूक हरले आणि वायनाडमध्ये जिकंले. वायनाडमध्ये मुस्लिम मतदार जास्त आहे तरीदेखील राहुल गांधी आम्हालाच म्हणतात की आम्ही फक्त मत खातो. मुळात काँग्रेसने आपला विश्वास गमावला आहे.

तिरंग्यात आहे हिरवा रंग, उद्धव ठाकरेंना टोला
ओवेसी म्हणतात उद्धव ठाकरे मला हिरवा साप म्हणतात. मात्र माझी आई तर मला मी हँडसम असल्याचे म्हणते आणि ती खरं बोलते. परंतु उद्धव ठाकरे हे विसरत आहेत की तिरंग्यात सुद्धा हिरवा रंग आहे असा टोला यावेळी ओवेसींनी लगावला आहे.

सत्ताधारी भाजपवर साधला निशाणा
तीन तलाक वर बोलताना ओवेसी म्हणाले की मोदी सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लिम महिला सक्षम होण्याऐवजी कमकुवत झाल्या आहेत. ओवेसी यांनी पीएमसी बँकेवरून देखील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप दोन कोटी रोजगार देणार होते. मात्र याबाबत आणि नोटबंदी बाबत काहीही न बोलता भाजप कलम 370 आणि पाकिस्तानवर बोलत असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी