राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा घोळ कायम ! पक्षाच्याच उमेदवारांना पराभूत करण्याचे केले आवाहन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनेच घोषित केलेल्या दोन अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेऊन दोन्ही उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी केले आहे.

करमाळ्यातून अपक्ष उमेदवाराला पाठींबा –

राष्ट्रवादी काँग्रेसने करमाळा मतदारसंघातून संजय पाटील घाटणेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अजित पवार यांनी करमाळ्यात झालेल्या सभेत घाटणेकर यांना डावलून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. संजय पाटील घाटणेकर यांचा अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता न आल्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संजयमामा शिंदे यांना मतदान करावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. तसेच याबाबत एक प्रसिद्धी पत्रकही राष्ट्रवादीने जारी केले आहे.

माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उभे राहून पराभूत झालेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. म्हणून राष्ट्रवादीने संजय पाटील-घाटणेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी मध्ये अंतर्गतनाट्यमय घडामोडी घडल्या असून त्यात चक्क राष्ट्रवादीनेच आपल्या उमेदवाराला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांचा हिसका दाखवतोच – घाटणेकरांची अजित पवारांना धमकी –

अजित पवारांच्या बदललेल्या भूमिकेमुळे संजय पाटील घाटणेकर चांगलेच संतापले असून तुम्हाला शेतकऱ्यांचा हिसका दाखवतोच, असा इशारा त्यांनी अजित पवार यांना दिला आहे.

सांगोल्यात शेकापला पाठिंबा –

सांगोल्यात माजी आमदार दीपक साळुंखे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. मात्र राष्ट्रवादीने शेकापला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर साळुंखे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना शेकापला पाठिंबा जाहीर करत दीपक साळुंखे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

Visit : Policenama.com 

You might also like