‘युती’ला शह देण्यासाठी ‘मनसे’ राष्ट्रवादीची छुपी ‘खेळी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये मनसेला घेण्याबाबत विचार करण्यात आला होता. मात्र, मनसेला विरोध होत असल्याने मनसेने विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. मनसेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युतीला शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि मनसेने खेळी करत काही मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी-मनसेची ही खेळी किती रंगत आणणार हे निवडणुकीत दिसणार आहे.

ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने आपले उमेदवार मागे घेऊन त्या ठिकाणी मनसेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी युती विरुद्ध मनसे असा सामना रंगणार आहे. ठाणे शहर मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेतल्याने या ठिकाणी मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना फायदा होणार आहे.

भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचा काही प्रमाणात प्रभाव आहे. भाजपला फायदा मिळू नये यासाठी राष्ट्रवादी मनसेच्या मदतीला धावून गेली आहे. राष्ट्रवादीचा तोच पॅटर्न कल्याण ग्रामीणमध्येही पहायला मिळाला. या मतदारसंघाध्ये राष्ट्रवादीने आपला उमेदवारच उभा केला नाही. हा मतदारसंघ युतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. शिवसेनेने रमेश म्हात्रे यांना उभे केले आहेत. तर मनसेकडून राजू पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या ठिकाणी मनसे विरुद्ध शिवसेना असाच सामना पहायला मिळणार आहे.

Visit : Policenama.com