‘मला आणखी काही नको’,… शरद पवारांचे भावनिक Tweet !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला भावनिक साद घातली आहे. शुक्रवारी रात्री पवारांनी ट्विटरवरुन ही पोस्ट शेअर केली.

ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचे दिग्गज मोहरे पक्षाला रामराम ठोकून सत्ताधारी भाजपची वाट धरत आहेत. अशावेळी ‘जाणता राजा’ म्हणून समर्थकांमध्ये ओळखले जाणारे शरद पवार एकाकी पडल्याची भावना बोलली जात आहे.

देशासमोर आज मोठे प्रश्न आहेत. शेतकरी, तरूण, कामगार अडचणीत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते काही करायला तयार नाहीत असे आरोप यावेळी पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

 

या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे. अशा प्रकारचे ट्विट पवारांनी यावेळी केले आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like