शरद पवारांच्या घणाघाती टीकेनंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं घेतला राजकीय संन्यास

पुणे (मावळ) : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी तिकीट कापल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब नेवाळे यांनी पक्षावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने नेवाळे यांना डावलून सुनील शेळके यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. तळेगाव येथे झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी बाळासाहेब नेवाळे यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी टीका केल्यानंतर नेवाळे यांनी राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केले. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
Balasaheb Newale
शरद पवारांनी नेवाळे यांच्यावर सभेमध्ये घणाघाती टीका केली. भर सभेत पवारांनी नेवाळे यांना अध्यक्षपद दिले, चेअरमन पद दिले तरी राष्ट्रवादीने काय दिले असे म्हणता अजून काय देऊ ? असे म्हणत नेवाळे यांच्यावर निशाणा साधला होता. बाळासाहेब नेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सध्याचे राजकारण पैसा घेऊन येणे आणि निवडून आल्यानंतर पैसे कमवायचे अशा प्रकारचे झाले आहे. सध्या अशा प्रकारचे राजकारण मावळमध्ये सुरु असल्याचे सांगत यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

नेवाळे सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक असून त्यांनी शरद पवारांच्या टीकेनंतर या दोन्ही पदांचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. नेवाळे यांनी आज सर्व पदांचे राजीनामे दिले असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी पक्ष हा डबघाईला आला असल्याची सडेतोड टीका नेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Visit : Policenama.com