राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता राजीनामा देणार, शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. विविध नेत्यांनी आणि आमदारांनी पदाचा राजीनामा देत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Related image

शिवसेना नेते रामदास कदम आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आज भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विविध नेते आणि आमदार सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. भास्कर जाधव आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द करणार असून त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जाधव यांच्याबरोबर अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांचा हा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी खोडून काढल्याने आज नक्की काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पवार साहेबांनी त्यांना खूप काही दिले, मात्र त्यांनी केलेला दावा हा खोटा असून एक दोन सदस्य वगळता त्यांच्याबरोबर शिवसेनेत कुणीही प्रवेश करणार नाही.

जाधव यांच्याविरुद्ध लढण्यासाठी तिघे इच्छुक –
भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या तीन जण इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या गुहागर विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरस निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जाधव यांनी जरी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला तरी त्यांच्यासाठी हि निवडणूक अवघड असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –