‘वंचित’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत ‘NCP’च्या बड्या पदाधिकाऱ्याचे नाव, राष्ट्रवादीच्या गोटात ‘खळबळ’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव झकळल्याने राजकीय क्षेत्रात वातावरण चांगलेच तापले. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचे नाव चक्क वंचितच्या यादीत झळकल्याने त्यांना चांगलाच घाम फुटला. सोमवारी वंचितची दुसरी यादी जाहीर झाली.

इच्छुक उमेदवार असलेले महेंद्र लोढा हे विधानसभा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेचे मित्र आहेत. हा मतदार संघ तसा काँग्रेसचा. येथून 15 वर्षे काँग्रेसचे उमदेवार निवडून आले. मागच्या निवडणूकीत या ठिकाणी भाजपने बाजी मारली. असे असताना आघाडीच्या यादीत न येता त्यांचे लोढा यांचे नाव वंचितच्या यादीत आल्याने महेंद्र लोढा अडचणीत आले आहेत.

वंचितच्या दुसऱ्या यादीत 122 जणांची नावे आहेत. याआधी देखील वंचित ने आपली यादी जाहीर केली होती. या यादीत 22 जणांची नावे होती. आता पर्यंत वंचितने 142 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उर्वरित यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.

वंचितचे जामनेरचे उमेदवार सुमीत चव्हाण हे गिरिश महाजन यांच्या विरोधात उतरणार आहे. तर भोकर मधून देखील वंचितने नामदेव आईलवार यांना आखाड्यात उतरवले आहे.

राज्यात असलेल्या विधानसभेमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत वातावरण चांगलेच तापले आहे. परंतू भाजप सेनेची युती होणार का हे अजून स्पष्ट झाले नाही. इकडे सेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. एमआयएम आणि वंचितचा ऐन निवडणूक तोंडावर असताना तलाक झाला. त्यानंतर वंचितने जाहीर केलेल्या यादी उमेदवारसह त्यांच्या जाती देखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

Visit : policenama.com