पुण्यात राष्ट्रवादीला धक्का, बंडखोर नेत्याचा भाजपला पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाले नसल्याने अनेक इच्छूक उमेदवारांनी बंडखोरी केली. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरुन बंडोखोरांनी माघार घेत आपापल्या पक्षातील उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र, शिरुर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छूक असलेले प्रदीप कंद यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला. कंद यांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन भाजपचे उमेदवार बाबुराव पाचार्णे यांना पाठिंबा जाहिर केला. प्रदिप कंद हे शिरुर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छूक होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली. कंद यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने शिरुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अशोक पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तर भाजपची ताकद वाढली आहे.

प्रदिप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांची रविवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपला मनोदय बोलून दाखवला. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता येण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देत आहोत. तसेच भाजपे बाबूराव पाचार्णे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी संपूर्ण ताकद लावू असे आश्वासन कंद यांनी दिले.

Visit : Policenama.com