40 वर्षे गवत उपटत होते का ? शरद पवारांचा पिचडांना सवाल

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर केली आहे. अहमदनगरच्या अकोले येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

मधुकर पिचड यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ‘अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले. भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ द्या. पण पक्षांतर करण्याचे कारण ते विकास करण्यासाठी गेलो असे सांगतात. मग त्यांनी 40 वर्षे इकडे गवत उपटले काय ? आदिवासींसाठी आम्ही केलेल्या कायद्याचे उल्लंघन करून त्यांनी भलत्याच तालुक्यात विकास केला. याचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून ते तिकडे गेले.’ पिचडांना धडा शिकविण्याची संधी सोडू नका. असे आवाहनही पवार यांनी या वेळी मतदारांना केले.

अकोले विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत वैभव पिचड राष्ट्रवादीकडून आमदार होते. ह्या निवडणुकीला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मधुकर पिचड हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी