तुमच्याच जीवावर निवडून येतो त्यामुळे तुमच्याच भल्यासाठी काम करत राहणार : आ. कुल

कुलांवर झालेल्या टिकेने भाजपचे दिग्गज उतरले मैदानात

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील तमाम जनतेने कुल कुटुंबियांना भरभरून प्रेम दिले. स्व.अण्णा असो, आई असो अथवा मी असो आपण सर्वांनीच आमच्यावर वेळोवेळी विश्वास दाखवून आम्हाला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्यामुळे तालुक्याच्या हिताचे निर्णय घेण्यास ऊर्जा मिळत गेली. मी आपणांस सांगू इच्छितो की तुम्ही मला या निवडणुकीत साथ द्या मी या तालुक्याला राज्यातील एक अग्रगण्य तालुका म्हणून याची ओळख निर्माण करून दिल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन करत आमदार राहुल कुल यांनी करत शेवटी मी तुमच्याच जीवावर निवडून येतोय आणि तुमच्याच भल्यासाठी काम करत राहणार आहे अशी ग्वाही पाटस येथील जाहीर सभेत दिली.

आ.कुल यांनी विविध योजनांबाबत बोलताना अतिक्रमण असलेल्या ७००० घरांपैकी आत्तापार्यंत ५०० घरे नियमित करून त्यांचे उतारे त्यांना दिले आहेत राहिलेल्या सर्व घरांचे उतारेही त्यांना मिळणार आहेत. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यात यश आले आहे, धनगर आरक्षणाचे काम ही ९०% पूर्ण झाले आहे. ओबीसी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यश आले आहे. अल्पसंख्यांक निधी काय असतो हे आपल्याच काळात आपण दाखवून दिले आहे.

पाटस येथील शिव स्मारक, अहिल्याबाई स्मारक करणार आहे. एबी फॉर्म बाबत बोलताना आपण कधीच कुणाला फसवले नाही आणि अंधारातही ठेवले नाही असे सांगत राज्यात महायुती ही धनुष्यबाण १२४ आणि कमळ १६४ चिन्हावर लढत आहे. चिन्हावर लढण्याचा आदेश वरिष्ठांकडून आला होता तो फक्त आम्ही पाळला आहे. मागील सरकारने ५० वर्षांमध्ये धनगर समाजाला आरक्षण, सुविधा देऊ शकले नाही पण या सरकारने पाच वर्षात त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे सांगितले.

पाच वर्षातील सर्वात मोठे काम जर कोणते असेल तर मुळशी धरणाचे पाणी हे दौंडला आणण्यासाठी एक समिती स्थापन झाली आणि ते पाणी आता दौंडला आणणार असल्याचे सांगितले. बेबी कॅनॉलचे पाणी पाटस व पुढे जाण्यासाठी त्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे होते त्यासाठी आता मोठा निधी उपलब्ध झाला आहे आणि याचा मोठा फायदा शेतीला होणार आहे. तालुक्याला सर्वगुण संपन्न असतानाही या तालुक्याला कधी लोकसभेची संधी देण्यात आली नाही ती संधी भाजप सरकाने दिली. कारखाण्यावर विरोधक टिका करतात पण या मंडळींनी अडचणीत आणलेला कारखाना आम्ही चालवला तो दौंड सहकारी सारखा विकून खाजगी तर केला नाही. आम्ही भीमा पाटस ही संस्था वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू आणि तो चालवूच असे शेवटी त्यांनी सांगितले.

वसंत साळुंके यांनी बोलताना माजी आमदारांना ताळेबंदातल काही समजत नाही त्यामुळे हे कारखाण्याच्या मिटिंगला येतच नाहीत कारण मी त्यांच्यासोबत काम केलं आहे त्यामुळे मला माहित आहे की यांना कारखान्यातील काही कळत नाही अशी टिका केली.

रासपचे दादा केसकर यांनी धनगरांच्या पाठीत खरा खंजीर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंडळींनी खुपसला हे धनगर बांधवांना माहीत आहे. समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून राहुल कुल यांचे नाव बदनाम करायचे षडयंत्र सुरू असल्याचे सांगितले. नागसेन धेंडे यांनी आ.राहुल कुल यांच्या माध्यमातून दौंड शहराची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. राजाराम तांबे यांनी विरोधक खालच्या पातळीवर जाऊन बोलतात पण आम्ही बोलायला लागलो तर विरोधकांची ना रहेगा बास
बजेगी बासुरी अशी अवस्था होईल. दादांच्या माध्यमातून मुळशी धरणाचे पाणी दौंडमध्ये आले तर तालुका सुजलाम सुफलाम होऊन जाईल.

पवार साहेब तुम्हाला दौंड तालुक्याने भरभरून दिले असे म्हणता, मग तुम्ही तालुक्यासाठी भरभरून का दिले नाही असा प्रश्न उपस्थित केला. महेश भागवत यांनी कारखाण्याच्या निवडणुकीत कुणी पळपुटेपणाची भूमिका घेतली हे जनतेला माहीत आहे. तुम्हाला कारखाण्याची इतकी कळकळ होती तर मग कारखाण्याची निवडणूक का नाही लढवली. यांना कारखाना फक्त प्रचारासाठी हवाय त्याला मदत करण्यात यांना रस नाही. ही मंडळी फक्त टिका करण्यात धन्यता मानतात यांनी यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत नेमकं काय केलं? कोणत्या संस्था काढल्या? केडगावचा १०० कोटींचा विकास करू म्हणले कुठे गेला तो विकास? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

विरोधक कुल यांना टार्गेट का करत आहेत तर कांचन कुल यांनी लोकसभेत यांच्या विरोधात उभे राहून यांना आव्हान उभे केले म्हणून यांना आता मिर्ची लागली असून ते कुलांना संपवण्याची भाषा बोलत आहेत. या कार्यक्रमात पाटस, मलठण मधील अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. पाटस मुस्लिम समाजाने यावेळी त्यांना पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमाला आनंद थोरात, रासप चे दादा केसकर, हरीश खोमणे, राजाराम तांबे, तानाजी दिवेकर, नंदू पवार, महेश भागवत, आरपीआयचे नागसेन धेंडे, साहेबराव वाबळे, वसंत साळुंके, समीर सय्यद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन साहेबराव वाबळे यांनी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी