पुण्यात वडगावशेरीमध्ये ‘नो वॉटर व्हाय व्होट’चे फलक लावून स्थनिकांनी विचारला आमदारांना ‘जाब’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सगळीकडे राजकारणाची चर्चा सुरु आहे. येणाऱ्या विधासभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकांचा काळ असल्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता नेत्यांपाठोपाठ लोकांनीही आपल्या स्थानिक उमेदवारांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पुण्यात वडगावशेरी भागात नागरिकांनी चक्क ‘नो वॉटर व्हाय व्होट’ चे फलक लावून स्थानिक आमदार जगदीश मुळीक यांचा निषेद व्यक्त केला आहे.

वडगावशेरी भागातील ब्रम्हा सनसिटी या सोसायटीने थेट ‘नो वॉटर व्हाय व्होट’ चा फलक लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे. या सोसायटीतील रहिवाश्यांनी जर आमचा ७५ % मेंटेनन्स हा पाण्याचे टँकर आण्यासाठी खर्च होत असेल तर आम्ही मतदान का करायचं अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सोसायटीने अशा प्रकारचे फलक आपल्या गेटवर लावले होते.

वडगावशेरीला टँकर वाद हा काही नवीन नाही मात्र ऐन निवडणुकीवर नागरिकांनी स्थानिक उमेदवार आणि विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्याविरोधात फलक लावल्याने आमदारांच्या कार्यकर्त्यानकडून हा फलक फाडण्यात आला तसेच सोसायटीच्या वॉचमनला मारहाणही करण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र आमदारांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जगदीश मुळीक यांनी मारहाणीबाबतचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले तसेच त्यांच्या कारकिर्दीत वडगावशेरीमध्ये ७५ % टँकरची संख्या कमी झाल्याचे सांगितले. तसेच भामा आसखेडचे पाणी आणून ही समस्या लवकर सोडवणार असल्याचे आश्वासन मुळीक यांनी दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच खराडी वडगावशेरीचे माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र ऐन निवडणुकीत स्वतःच्याच मतदारसंघात आमदार जगदीश मुळीक यांच्या विरोधात स्थानिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी