विधानसभा 2019 : राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा ? काय सांगतात 3 ‘ओपिनियन पोल’चे आकडे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहेत. सध्या कोणाची सत्ता येणार याबाबत चर्चा होताना दिसत आहे. या निवडणुकीत युतीला धक्का देत आघाडीचा राजकीय कमबॅकचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे महायुतीसमोर आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. अद्याप महाराष्ट्रातील जनतेचा प्रत्यक्ष कौल काय आहे हे मात्र समोरआलेले नाही. असे असले तरी काही संस्थांनी ओपिनियन पोल घेत वारं कोणाच्या दिशेने वाहतंय याचा अंदाज मांडला आहे.

कोणत्या ओपिनियन पोलमध्ये कोणाला किती जागा मिळतील ?

जन की बात
एकूण जागा- 288
महायुती-
225-232
महाआघाडी- 55
अपक्ष/इतर- 33

नेता अ‍ॅप
भाजप-
142-147
शिवसेना- 83-85
काँग्रेस- 21-23
राष्ट्रवादी- 27-29

सी वोटर
महायुती-
200
महाआघाडी- 55
अपक्ष इतर- 33

मागच्या निवडणुकीत काय झालं होतं ?
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची 25 वर्षांची युती तुटली होती. तर आघाडीनेही काडीमोड घेतला होता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निडवणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या होत्या. याशिवाय सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मात देत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.

आघाडीने राज्यात असलेली 15 वर्षांपासूनची सत्ता गेल्या निवडणुकीत गमावली. कोणत्याही एका पक्षाला 145 जागांचा आकडा गाठता आला नाही. कारण स्पष्ट बहुमतासाठी 145 जागांचा आकडा गाठणं आवश्यक असतं. त्यामुळे भाजप-सेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचं सरकार स्थापन केलं.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चा तपशील

एकूण जागा- 288
भाजप-
122
शिवसेना- 63
काँग्रेस- 42
राष्ट्रवादी- 41

कोणत्या विभागात काय स्थिती होती ?

कोकण
एकूण जागा- 75

भाजप- 25
शिवसेना- 28
काँग्रेस- 6
राष्ट्रवादी- 8
इतर- 8

पश्चिम महाराष्ट्र
एकूण जागा-
58

भाजप- 19
शिवसेना- 12
काँग्रेस- 7
राष्ट्रवादी- 16
इतर- 4

विदर्भ
एकूण जागा-
62

भाजप- 44
शिवसेना- 4
काँग्रेस- 10
राष्ट्रवादी- 1
इतर- 3

मराठवाडा
एकूण जागा-
46

भाजप- 15
शिवसेना- 11
काँग्रेस- 9
राष्ट्रवादी- 8
इतर- 3

उत्तर महाराष्ट्र
एकूण जागा-
47

भाजप- 19
शिवसेना- 8
काँग्रेस- 10
राष्ट्रवादी- 8
इतर- 2

Visit : Policenama.com 

महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या