खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी- कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत असे कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर यांनी कळविले आहे.

पुणे जिल्हा क्षेत्रातील दुकाने, निवासी हॉटेल्स,  खाद्यगृह, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेल्स आदी आस्थापनांवरील कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कामगार आपल्या निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी.

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास दोन ते तीन तासांची सुटी देता येईल. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी मालकांनी घेणे आवश्यक असेल. या संदर्भात काहीही तक्रार असल्यास संबंधित कामगारांनी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उप आयुक्त पुणे यांनी केले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी