शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी प्रचार करुन पंकजा मुंडे करणार लोकसभेची ‘परतफेड’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे बीड मतदार संघात तळ ठोकून आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ओबीसी नेत्यांबरोबर असलेली राजकीय अंडरस्टँडिंग आज पुन्हा दिसून आली. पंकजा मुंडे यांनी देखील मुंडे क्षीरसागर संबंध कायम ठेवले आहेत.

लोकसभा निवडणूकवेळी प्रितम मुंडे यांना विजयी करण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी मोर्चेबांधणी केली होती. आता याचीच परतफेड करताना पंकजा मुंडे दिसत आहेत. दसरा मेळाव्यात जयदत्त क्षीरसागर पहिल्यांदाच सावरगावला हजर होते.

या दोन्ही कुटूंबातील कुटूंबाचा जिव्हाळा वर्षानुवर्ष आहे. स्वर्गीय गोपीनाथ आणि क्षीरसागर एकमेकांना कधी परके वाटले नाही. जरी त्यांची राजकीय विचारधारा वेगवेगळी होती तरी अडीअडचणीत त्यांनी पक्ष बाजूला ठेवून एकमेकांना मदत केली. लोकसभा निवडणूकीत खासदार प्रीतम मुंडे यांना जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीमध्ये असून देखील पाठिंबा जाहीर केला होता. त्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावले होते.

लोकसभेत जयदत्त क्षीरसागर यांनी मुंडे भगिणींना पाठींबा देत मैदानात उतरले, त्यानंतर क्षीरसागर यांना शिवसेनेत प्रवेश केला. आता बीडमधून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर निवडणूकीच्या मैदानात आहेत. या लढतीत काका क्षीरसागर यांच्या मदतीला पंकजा मुंडे धावून आल्या आहेत.

बीड मतदार संघात गुरुवारी पहिली सभा रायमोहा येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. पंकजा मुंडे देखील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचारसभेत उतरणार आहेत. यावेळी मुंडे आणि क्षीरसागर यांची अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली, परंतू मतदार संघातील नाराज भाजप नेत्यांची समजूत पंकजा मुंडेना काढावी लागणार आहे.

Visit : Policenama.com 

You might also like