आ. लक्ष्मण जगतापांना पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनसह विविध संस्था-संघटनांचा जाहीर पाठिंबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनसह मतदारसंघातील विविध सामाजिक, औद्योगिक तसेच गृहनिर्माण संस्था व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष सनील कडूसकर यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश थंबा, सचिव अ‍ॅड. गोरख कुंभार, अ‍ॅड. स्मिता लांडे पाटील, सहसचिव अ‍ॅड. अंकुश गोयल, खजिनदार अ‍ॅड. संतोष मोरे, हिशोब तपासणीस अ‍ॅड. महेश टेमगिरे, सदस्य अ‍ॅड. रामचंद्र बोराटे, अ‍ॅड. विजय बाबर, अ‍ॅड. सुनील रानवडे, अ‍ॅड. नीलेश ठोकळ, अ‍ॅड. पूनम राऊत, अ‍ॅड. केशव घोगरे आदी उपस्थित होते. शहरातील लघु उद्योजकांची शिखर संघटना असलेल्या पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे आणि सचिव जयंत कड यांनी आमदार जगताप यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

पिंपळेगुरव येथील साईराज रेसिडन्सी सहकारी गृहरचना संस्थेने आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार असोसिएशनने आमदार जगताप यांना पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रामदास जंगम यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. महाड-पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचे अध्यक्ष गणेश मालुसरे, कार्याध्यक्ष राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष अश्विनी उत्तेकर यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कोकण रहिवासी संघाने आमदार जगताप यांना पाठिंबा दिला आहे. संघाचे संयोजक अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अ‍ॅड. चंद्रकांत गायकवाड, विलास गवस, अ‍ॅड. उमेश गावकर, विजय परब यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. हिंद मजदूर सभा संलग्न महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शरमाळे, कार्याध्यक्ष शहाजी पाटील यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन इन सर्व्हिस ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिजच्या लघु उद्योग भारती संघटनेने आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिपक फल्ले, महामंत्री राहुल खोले, खजिनदार प्रदीप जाधव, संचालक राममूर्ती थेवर उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास मंच पिंपरी-चिंचवड शहर या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भिसे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास बनसोडे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावेळी पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुनीता हिरेमठ, अश्विनी पुराणिक, पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा राजश्री पोटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजेश हातेकर, पुणे शहराध्यक्ष मयूर गुजर, सुहास मोरे, प्रसिद्धीप्रमुख लॉरेन्स जाधव आदी उपस्थित होते. राजर्षि शाहू महाराज कोल्हापूर मित्र मंडळ सांगवी, पिंपळे गुरवच्या वतीने आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय संघटक बाबा कांबळे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहर लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कळसे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. महाराष्ट्र मजूर पक्षाचे राष्ट्रीय नेते भाऊसाहेब आडागळे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहर सातारा जिल्हा मित्र मंडळाचे संस्थापक सुनील जाधव यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव विलास भोसले यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

दळवीनगर व भोईरनगर व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष सतपाल गोयल यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड देवांग कोष्टी समाज संघटनेने आमदार जगताप यांना पाठिंबा दिला आहे. जय मल्हार क्रांती संघटना पिंपरी-चिंचवड शहर व सर्व रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या वतीने आमदार जगताप यांना पाठिंबा देण्यात आला आहे. राष्ट्रीय भोई समाज क्रांतीदल व भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टने आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. खान्देश मित्र मंडळाने आमदार जगताप यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरसे, उपाध्यक्ष नितीन पाटील, सचिव लोटन बोरसे, खजिनदार विजय पाटील उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या