विधानसभा 2019 ! पिंपरीत बनसोडे आणि चाबुकस्वार यांच्यात थेट लढत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे बंडखोर शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, यांच्यासह नगरसेवक राजू बनसोडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पिंपरीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अर्थात गौतम चाबुकस्वार विरुद्ध अण्णा बनसोडे यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे.

पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसने अण्णा बनसोडे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली. मात्र तीव्र इच्छुक असलेले शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र आज या दोन्ही बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेत अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शविला आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, उमेदवार अण्णा बनसोडे, नगरसेवक राजू मिसाळ, रोहित काटे, मोरेश्वर भोंडवे आदी उपस्थित होते. दरम्यान, महायुतीतील बंडखोर अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार पाठिंबा दर्शवला आहे.

Visit : Policenama.com