राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात PM नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा उदयनराजेंसाठी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली असून प्रत्येक प्रमुख पक्ष आपल्या पक्षातील स्टार प्रचारकांना प्रचारासाठी लवकरच उतरवणार आहेत. भाजपने देखील त्यासाठी खास योजना तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. भाजपचा हुकमी एक्का असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याची पहिली सभा राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच साताऱ्यात होणार असून या ठिकाणी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यासाठी ते पहिली सभा घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 3 दिवस राज्यामध्ये विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी साताऱ्यात पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील आपली पहिली सभा उदयनराजे यांच्यासाठी घेणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहेत. राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण 9 सभा होणार आहेत.

Visit : Policenama.com