पुरंदर – हवेली विधानसभेसाठी 05 उमेदवारांची माघार, 11 उमेदवार रिंगणात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – २०२ पुरंदर विधानसभा मतदार संघातून एकूण २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. काँग्रेसचे संजय जगताप यांनी चार तर शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ०१, भारतीय जनता पार्टी ०२, शिवसेना ०१ असे ०४ अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये ०७ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची मुदत होती त्यामध्ये ०५ उमेदवारांनी माघार घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.

अर्ज माघार घेणारे उमेदवारांचे नाव व निवडणुक लढवणारे उमेदवार खालीलप्रमाणे
अर्ज माघार घेणारे उमेदवार- 
१) प्रमोद संजय दिवेकर (अपक्ष) – वैध
२) चंदन विनायक मेमाणे (अपक्ष) – वैध
३) दिलीप सोपान यादव (शिवसेना) – वैध
४) सुरेश बाबुराव वीर (अपक्ष) – वैध
५) गणपत शंकर दगडे (अपक्ष) – वैध

निवडणुक लढवणारे उमेदवार
१) डॉ.उदयकुमार वसंतराव जगताप (अपक्ष) – वैध
२) संजय चंद्रकांत जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – वैध
३) विजय सोपानराव शिवतारे (शिवसेना) – वैध
४) महादेव साहेबराव खेंगरे (अपक्ष) – वैध
५) रमेश महादेव उरवणे (अपक्ष) – वैध
६) किरण बापू सोनवणे (बहुजन समाज पार्टी) – वैध
७) मनोहर निवृत्ती शेवाळे (संभाजी ब्रीगेड पार्टी) – वैध
८) अतुल महादेव नागरे (वंचित बहुजन आघाडी) – वैध
०९) बाळासाहेब बबन झिंजुरके (अपक्ष) – वैध
१०) ज्ञानेश्वर तुकाराम कटके (अपक्ष) – वैध
११) नवनाथ चंद्रकांत माळवे (बहुजन मुक्ती पार्टी) – वैध

Visit : Policenama.com