विधानसभा 2019 : अखेर ‘त्या’ जागेवरुन शिवसेना – RPI मध्ये ‘सेटलमेंट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आरपीआयने मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. या जागेवर मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी आरपीआयकडून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली असून आरपीआय महायुतीमध्ये मित्र पक्ष असल्याने ही जागा सोडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांच्या चर्चा झाली. चर्चेनंतर आरपीआयने या जागेवरील दावा सोडला असून गौतम सोनवणे हे उद्या आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार आहेत.

तसेच राज्यामध्ये शिवसेनेने ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत तेथे आरपीआयने दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांच्या चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी आरपीआय मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी मानखुर्द शिवाजीनगर येथे दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घण्याबाबत विनंती केली. सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा त्यांना पुढील काळात सत्तेत चांगली संधी देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे.

राज्यामध्ये आरपीआय, भाजप-शिवसेना महायुती अभेद्य असून महायुतीला विजयी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच रामदास आठवले यांचा आदेश मान्य करून आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे गौतम सोनवणे यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच आठवले यांनी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात असला तरी सामाजिक दृष्ट्या विचार करून ती जागा आरपीआयला सोडावी अशी मागमी केली होती.

Visit : Policenama.com