आदित्य ठाकरेंच्या विरोधात RPI चे ‘हे’ नेते निवडणूक लढवण्यास ‘उत्सुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यभर विधानसभा निवडणूक २०१९ चा माहोल आहे. अनेक पक्षांनी आपल्या पक्षांतर्फे उमेद्वाऱ्या निश्चित करणे सुरु केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. महत्वाचं म्हणजे ते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार असल्याचे समजताच खरात यांनी जयंत पाटील यांना पत्र लिहून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर का, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवणार असेल तर आजघडीला आघाडीचा उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपली उमेदवारी असणार असे पत्राच्या माध्यमातून कळवले आहे.

युतीमध्ये आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवरून वाद
अनिल परब यांनी वरळी मतदार संघातून ठाकरे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच गडबडले होते. ते म्हणाले होते की, परब हे काय युतीचे अधिकृत प्रवक्ते आहेत का..? असा प्रश्न विचारला होता. यावरून असे समजून इतकी, भाजप- सेनेत सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येते. उमेदवारीवरून दोन्ही पक्षांत वाद असल्याचे समोर येत आहे.

आदित्य यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता
शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला पाहायला आवडेल असे म्हटले होते. आदित्य यांचा वाढत्या वयाबरोबर अभ्यासही वाढला आहे. ते मुख्यमंत्री होण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आदित्य यांच्या उमेदवारीवरून वाद सुरु आहेत.

राऊतांच्या ‘या’ फेसबुक पोस्टवरून खूप काही समजले
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित दोघांचा एक फोटो फेसबुक वर शेअर करत फोटोखाली कॅप्शन लिहिले होते की, ‘महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.’ यावरून युवानेते आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे अंदाज स्पष्ट झाले होते.

महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत ठाकरे परिवारातील एकानेही निवडणूक लढवली नाहीये. आदित्य ठाकरे निवडणूक लढवतील की, नाही हा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरे यांचा असेल. असे राऊत यांनी स्पष्ट केले होते. पुढे राऊत म्हणाले २८ वर्षीय आदित्य ठाकरे चांगले परिश्रम घेत आहेत. आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला पक्ष वाढण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत शिवसेनेला भरभरून यश मिळावे म्हणून ते खूप मेहनत घेत आहेत.

ठाकरे कधीही उपपद घेत नाहीत
राज्यात भाजप – शिवसेनेची सत्ता कायम ठेवण्याचं दृष्टिकोनातून आदित्य यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल का असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले ठाकरे कधीही उपपद घेत नाहीत. ठाकरे घराण्यातील सदस्य कायम प्रमुख पदी असतो. ठाकरे घराण्याची राज्यात तसेच देशात एक प्रतिष्ठा आहे.