धावपटू कविता राऊत राजकारणाच्या ट्रॅकवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू आणि ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणारी कविता राऊत राजकारणात येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेस सोडलेल्या आमदार निर्मला गावित यांच्याविरोधात विधान सभा निवडणुकीला रिंगणात उतरवले जाऊ शकते. नंदूरबारमधून सलग 9 वेळा काँग्रेसच्या तिकीटवार निवडून आलेले माजी खासदार आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यावर उपाय म्हणून आघाडीनेही व्यूहरचना रचण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस सोडलेल्या आमदार निर्मला गावित यांच्याविरोधात धावपटू कवित राऊतला उतरवण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

कविता राऊत राजकारणात येण्याच्या चर्चेवर कविता राऊत यांचे पती म्हणाले की, ‘काँग्रेसकडून उमेदवारीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडून आलेला नाही. मात्र असा प्रस्ताव आल्यास जरूर सकारात्मक विचार करू.’

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी नुकताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सोपवून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –