आरोप करणाऱ्यांनी ‘विष्ठा’ खावी, मंत्री सदाभाऊ खोतांचे ‘वादग्रस्त’ वक्तव्य

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाइन – कडकनाथ फसवणूक प्रकरणावर विरोधकांचा समाचार घेताना कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी असे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पुरावे दाखवले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, मात्र तो पुराव त्यांनी भर चौकात दाखवावा आणि पुरावा दाखवता येणार नसेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी भर चौकात विष्ठा खावी असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.

स्वाभीमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे आमनेसामने आले असून यांच्यामध्ये ‘कडनाथ’ कोंबडी यावेळी निमित्त ठरली आहे. राजू शेट्टी यांच्यावर निषाणा साधताना सदाभाऊ खोत म्हणाले, शेट्टी तुम्ही लालूप्रसाद यादव यांना हॉस्पीटलमध्ये जाऊन भेटता. त्यांच्यावर चारा घोटाळ्याचे आरोप आहेत. मग तुम्ही लालूंचे साथीदार होता का ? असा सवाल करत त्यांनी कडकनाथ प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे सीआयडी चौकशीची मागणी केली असल्याचे सांगितले.

कडनाथ प्रकरणात सीआयडी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगून, राजयकीय लढाई राजकारणाच्या पातळीवर लढायला हवी. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्हीही लढाऊ असून शेट्टी यांना कोंबडीचे तांगडे खायची सवय आहे. त्याने दुसरे काही आठवणार नाही. तांगडे खाणाऱ्यांनी आपल्या आईची शपथ घ्यावी असे ही खोत म्हणाले.