विधानसभा 2019 : संभाजी ब्रिगेडची दुसरी यादी जाहीर, पुण्यातून रंजना जाधव यांना उमेदवारी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनालइन – आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मागील 25 वर्षे दुसऱ्यांसाठी लढलो आता स्वत:साठी जिंकण्याकरीता निवडणुका लढवणार असल्याचे सांगत संभाजी ब्रिगेड देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. संभाजी ब्रिगेडने 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून रंजना सुभाष जाधव यांना उमेदवारी दिली आहे. संभाजी ब्रिगेडने यापूर्वी 15 जणांची यादी जाहीर केली होती.

संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची 15 सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे आणि महासिचव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक झाली. यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब केले. संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. निवडणुकीमध्ये जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन निवडणूक लढवणार असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची दुसरी यादी..

1. डॉ.प्रशांतकुमार उत्तमराव मावंडे- रिसोड मालेगाव
2. राहुल जयवंतराव बलखंडे – वाशिम
3. अजय पांडुरंगजी धोबे- वणी
4. सुभाष भगवानराव कोल्हे- लोहा-कंधार
5. सूर्यकांत मारुती चंद्रे -देगलूर बिलोली
6. बालाजी जनार्धन आगलावे – मुखेड
7. रमेश तात्याराव गायकवाड- औरंगाबाद पूर्व
8. डॉ. अमितकुमार गोविलकर -कल्याण पश्निम
9. विकास कृष्णा मुकादम- ओहळा माजिवडा
10. पंढरीनाथ संपत सोंडकर -भोर-वेल्हा-मुळशी
11.रंजना सुभाष जाधव- पुणे कॅन्टोन्मेंट
12. छत्रभुज परमेश्वर देशमुख- माजलगाव-बीड
13. गोविंद निंबाजी पोतंगले- परळी, बीड
14. अभिमन्यू शेषराव पवार- औसा, लातूर