विधानसभा 2019 : ‘व्यंगचित्रा’ तून संजय राऊत यांचा भाजपवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीला काही अवधी राहिला असताना अद्याप शिवसेना-भाजपमध्ये युतीचे भिजत घोंगडे आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा झाली आहे. सेना-भाजपची जागा वाटपावरून खलबते सुरु असताना दोन्ही नेत्यांकडून युती तुटण्याची वक्तव्य करण्यात येत आहेत. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी ज्योतिषाचे व्यंगचित्र ट्विट केले आहे. ‘तुम्हाला शनीपिडेपेक्षा डेंजर ‘ईडी’ पिडा सुरु होण्याची चिन्हे आहेत. त्यावर उपाय म्हणजे कमळाचे फुल जवळ ठेवा…’ असे म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट द्वारे भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होणार की नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

दरम्यान, राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं. मी स्वत:च ईडी कार्यालयात हजर होतो, असं म्हणत शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांना अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता.

Visit : Policenama.com